महावितरणचा भोगळ कारभार
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
फलटण उप विभागातील नागरिकांना विजवितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या सरासरी वीज देयकाच्या नावावर अव्वाच्यासव्वा वीज बिले देण्यात आली आहेत.
सरकारने दिलेल्या आदेशाचा भंग करून सध्याच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आपल्याकडुन सर्वसामान्य ग्राहकांना सरासरी वीज देयकांच्या नावावर देण्यात आलेली वीज बिले त्वरीत थांबविणे बाबत ग्राहक मागणी करताना आढळतात. सरासरी वीज बिलाच्या नावावर अवाजवी बिल देवून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे .आपत्कालीन वस्तुस्थिती असताना सरकारने सध्याच्या आपत्तीजनक परीस्थितीमध्ये ग्राहकांना आर्थिक त्रास होऊ नये म्हणुन चालु परिस्थितीमध्ये वीज मिटरच्या वापराचे रीडींग न करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले असतानाही सदर आदेशाचा भंग करुन सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरासरी वीज देयकांच्या नावावर अन्यायकारक रकमा टाकून देण्यात येऊन त्यांना वेठीस धरण्यात आलेले असल्याबाबत अनेक तक्रारी सर्वसामान्य शेतकरी व इतर ग्राहक करताना आढळतात.
गेले तीन महिने रीडिंग घेतले गेलेले नाही. दर महिन्याला सरासरी युनिट पकडून विज बिले ऑनलाइन पाठवण्यात आली. ती विजबिले भरल्यामुळे महावितरणला त्यांची रक्कम मिळाली होती .परंतु आता यावेळेस मार्च मधील रीडिंग आणि जून मधील रीडींग यातील फरक म्हणून झालेल्या युनिटचे बिल पाठविण्यात आले आहे. मधल्या काळात सरासरी बिले म्हणून जी बिले पाठवली गेली ती ग्राहकांनी भरली आहेत. त्याची वजावट या बिलामध्ये झालेली दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांना फुकट भुर्दंड बसत आहे .वास्तविक सरासरी भरलेली बिले वजा जाता यावेळची बिले ग्राहकांना येणे गरजेचे होते. पण तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे ग्राहक हतबल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाढीव बिले कमी करून द्यावीत अशी ग्राहकांची ची मागणी आहे.
शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकानुसार यावर आधारित तोडगा काढून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे.