मुंबई, दि. ९ – राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशा सूचना ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत शासनाने नुकतेच शासन निर्णय निर्गमित केले आहेत. सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह ३ ते ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिल्या होत्या.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. प्रस्तुत वेतन हे संबंधित ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती श्री.मुश्रीफ यांनी दिली.
One Comment
blog
That is a good tip particularly to those new to the blogosphere.
Short but very precise information… Thanks for sharing this one.
A must read article!
My site: blog