महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कोव्हिड केअर सेंटरच्या (CCC) दोन उदघाटनामुळे भिगवणचे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं . एक उदघाटन भाजपाचे नेते तर दुसरे उदघाटन राष्ट्रवादीने केले आहे .एकाच दिवशी एकाच कामाचे दोन वेळा उदघाटन बघण्याची वेळ भिगवण करांवर आला.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि , मी स्वतः लक्ष घालून हे कोव्हिड सेंटर चालु करण्यासाठी प्रयत्न केले होते पण गंमत अशी झाली कि , तालुक्यातील प्रतिष्ठित भाजप नेत्यांना मात्र यात राजकीय स्टंट करण्याची हुकी आली आणि त्यांनी या कोव्हिड सेंटरसाठी आम्ही पाठ पुरावा केलाय याचे उदघाटन आम्हीच करणार म्हणत दुपारीच उदघाटन करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. या कोविड सेंटरचे उदघाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता शासकीय प्रोटोकॉल नुसार पार पडले .
यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले कि , आपल्याला गोरगरीब जनतेला मदत करायची आहे , कोणी उदघाटन करते याला महत्व नाही , परंतु या ट्रामा केअर मधील प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापासून मी लक्ष दिले आहे , त्यामुळे एवढी मोठी भव्यदिव्य इमारत या ठिकाणी उभी राहिली . कोव्हिड सेंटर तालुक्यात चार ठिकाणी चालू करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केला आहे . आपल्या इंदापूर तालुक्यातूनच नव्हे तर सोलापूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व मंत्रीमंडळ अहोरात्र मनापासून प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे . मी मंजूर करून आणलेल्या कामांचे विरोधक सुडबुदधीने राजकारण करीत आहेत , त्यांना माझे एवढेच सांगणे आहे कि , राजकारण करण्याची ही वेळ आणि जागा नाही . इंदापूर , भिगवण , निमगाव , बावडा या ठिकाणी कोव्हिड सेंटर चालू करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे , पैकी निमगाव व बावडा याठिकाणी सुद्धा थोड्याच दिवसात कोव्हिड केअर सेंटर चालू करावयाचे आहे . विरोधक
हे माझ्यावर टीका करतात मी एखादी संस्था काढून चालून दाखवावी , त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे , आमचे वडील चुलते मेंढर राखत होते .
आमच्याकडे कोणताही राजकीय वारसा नव्हता , म्हणून आम्ही संस्था काढल्या नाहीत , पण त्यांचे चुलते खासदार होते , त्यांनी इंदापूर साखर कारखाना उभा केला होता , दुधसंघ काढला होता
पण त्याना आयत्या मिळालेल्या या संस्थांचे पुढं काय झालं ??? आज त्यांची अवस्था काय आहे…? या पुढे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात व निरा भीमा सहकारी साखर कारखान्यात छत्रपती सहकारी साखर कारखान्या प्रमाणे सर्वांना सभासद करून घेतलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे .
दूधगंगा विषयाची फाईल मी पत्रकारबंधूंकडे दिली आहे त्यांनी त्याचा अभ्यास करून सत्य परिस्थिती जनते समोर मांडावी.
तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मी अजून भरपूर कामे मंजूर केली आहेत.
सगळे आपलेच आहेत उलट त्यांना जर उदघाटनच करायचं होत तर माझ्याबरोबर घेऊन मी स्वतः रेबिन बांधून ती त्यांना कापायला लावली असती . हे कोव्हिड केअर सेंटर चालू करण्यासाठी गेली ५-६ दिवस कष्ट घेणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी , पक्षाचे पदाधिकारी यांचे आणि विशेषतः सर्व डॉक्टरांचे मी अभिनंदन करतो .याच धर्तीवर लवकरच निमगाव आणि बावडा याठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येईल .
इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके म्हणाल्या कि , माजी. मंत्री हर्षवर्धन पाटील मंत्री असताना त्यांनी भिगवण येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर केले होते . अनेक दिवसांपासून याचे काम सुरू होते . आता हाॅस्पिटलचे काम पुर्ण झाले असून आता ते संकटकाळी नागरिकांच्या सेवेत आले आहे . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भिगवण व निमगांव केतकी येथे कोव्हिड सेंटर उभे करण्याची मागणी केली होती . यामुळे भिगवण व परिसराची मागणी लक्षात घेता इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीने भिगवण येथे कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात आले .
यावेळी उपसभापती संजय देहाडे म्हणाले की , भिगवण व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या होत्या . कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती . पण आता जवळच उपकाराची सोय झाल्याने सगळ्यांना एक आधार मिळाला आहे .
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट , तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व भिगवण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पराग जाधव , अशोक वणवे , कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत वाघ , संपत बंडगर , सुर्यकांत सवाने , तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा वाघ , सतीश काळे , युवराज काळंगे , तेजेश देवकाते , हनुमंत काजळे , सुनिल काळे , माऊली मारकड व आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .
One Comment
बाळासाहेब डोंबाळे
एकाच कामासाठी दोन दोन उद्घाटन करा .तशीच दोन दोन कामं तालुक्यात आना आम्ही दोघांना पण मतदान करु