नागरिकांची कामे करणारा नगरसेवक निवडून द्या :आ. शिवेंद्रसिंहराजे
यादोगोपाळ पेठेतील उद्यानाच्या कामाचा शुभारंभ
सातारा- नगरसेवक धनंजय जांभळे आणि नगरसेविका प्राची शहाणे या भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेत सत्ता नसतानाही लोकांच्या हिताची कामे केली आहेत. सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी आणला. नागरिकांनी असेच लोकांची कामे करणारे नगरसेवक निवडून दिले पाहिजेत, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
आरक्षण क्रमांक 42 यादोगोपाळ पेठ येथे नगरोत्थानमधून मंजूर असलेल्या 2 कोटी 9 लाख 48 हजार रुपये निधीतून बगीचा विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक धनंजय भाऊ जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, अविनाश कदम, माजी नगरसेवक भालचंद्र निकम, शरद काटकर, अमोल गुजर, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस, करंडीचे सरपंच शशिकांत जाधव, मुजफ्फर खान, बशीर भाई बागवान, राकेश शेंडगे, अविनाश खर्शीकर , चंदन घोडके, नंदकुमार चक्के, सचिन दळवी, जयेश देशमुख, गौरव शिंदे, प्रतिक जाधव, प्रतिक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यादोगोपाळ पेठेत बगीचा हा कित्येक वर्षापासून होणे अपेक्षित होते. तो प्रश्न प्रलंबित होता. नगरसेवक भाऊ जांभळे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा पाठपुरावा केला. पालिकेत सत्ता नसतानाही त्यांच्या चिकाटीमुळे निधी आणण्यास यश मिळाले आणि काम मार्गी लावले. लोकांसाठी काम करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. या कामासाठी निधी लागल्यास आमदार फंडातून भरीव स्वरूपात मदत करू असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यावेळी बोलताना धनंजय जांभळे म्हणाले, आपल्या सर्वांच्या स्वप्नातील गार्डन मार्गी लावण्याचा योग आला. त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 65 लाखाचे सर्व सोयींनी युक्त असे बहुउद्देशीय सभागृह सोमवार पेठेत उभारणार असून लग्नसोहळे, वाढदिवस, मुंज आदी छोटेमोठे कार्यक्रमासाठी लवकरच हा हॉल उपलब्ध होणार आहे. आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा नगरपालिका प्रशासनाचे प्रशासक अभिजित बापट, बांधकाम अभियंता दिलीप चिद्रे यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लागले आहे. बगिच्यात पाथ वे, वॉकिंग ट्रॅक, सुसज्ज शौचालय, सुशोभीकरण, एमपी 3 थेटर, छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी हॉल, ग्रंथालय वाचनालय, सेल्फी पॉइंट व लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळणी अशी सोय करण्यात येणार आहे,
असे त्यांनी सांगितले.या निमित्ताने पश्चिम भागात विकासाचे पर्व निर्माण होत आहे.

मुस्लिम समाजासाठी शादीखाना व बहुउद्देशीय सभागृह
नगरसेवक धनंजय भाऊ जांभळे हे सर्व समाजाचे कार्य करणारे तत्पर असे नगरसेवक म्हणून ओळखले जातात कोणत्याही समाजाचा प्रश्न असो ते तात्काळ सोडवण्यासाठी धावून जातात चुटकीसरशी प्रश्न सोडवतात हीच त्यांची ख्याती आहे मुस्लिम समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी त्यांच्याकडे होते त्यांनी ही समाजाची मागणी यानिमित्ताने पूर्ण केले आहे मुस्लिम समाजासाठी राखीव असलेली 15 गुंठे जागेत शादी खाना तसेच बहुउद्देशीय हॉल उभारण्यात येणार आहे. कामाचा शुभारंभ करताना आमदार श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, नगरसेवक अविनाश कदम व इतर






















