राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा ते रायगड (पाचाड) अशी आयोजित करण्यात आलेली भव्य रथयात्रा मंगळवार, दि. ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता फलटण शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.
यावेळी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले यांच्या हस्ते रथपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा राज्यभर विविध ठिकाणी पोहोचत असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या सोहळ्यास फलटण शहर व तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, फलटण, संभाजी ब्रिगेड फलटण आणि जिजाऊ ब्रिगेड फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
































