महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सांगितले आहे की बंद करण्याचा निर्णय हा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी आमच्याकडे कोणतीही परवानगी मागितली नाही आणि आम्ही ती दिलेली नाही. मात्र बंदमध्ये सहभागी व्हायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाईल.

फलटण मध्ये 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत फलटण शहर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय फलटण येथील व्यापारी संघटनेने घेऊन तो संदेश समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्याच्या विरोधात भुमिका घेत काही जणांनी त्या निर्णयावर हरकत नोंदवली होती. आपत्कालीन परिस्थिती असताना व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर काय कारवाई होणार याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागलेले होते.
One Comment
Shubham Anil Pore
No, we don’t agree for Janta Carfew, A lot of Loss from lock down already. There is no lockdown from 12.