सातारा : २० ऑक्टोबर २०२२ रोजी श्री. समिर अस्लम शेख यांची सातारा जिल्हयाचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. श्री. समिर अस्लम शेख आज २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सातारा जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
नूतन पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्विकारले नंतर त्यांना शुभेच्छा देण्याकरीता भेटण्यास येणारे नागरीकांना त्यांनी विनंती केली आहे की, येताना त्यांनी शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई, खादयपदार्थ न आणता नविन आवृत्तीची केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तहसिलदार, कक्ष अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, दुय्यम निबंधक, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक इ. पदाची तसेच पोलीस भरती या स्पर्धा परिक्षेची पुस्तकें आणावीत, जेणे करुन गडचिरोली येथील गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.




















