महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
नीरा खोरे यातील नीरा देवधर , भाटघर , गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाल्याने वीर धरण ९४.२६ टक्के भरले आहे नीरा खोरे परिसरात पाऊस झालेने वीर धरणात ५००० क्युसेसने पाण्याची आवक होत असल्यामुळे वीर धरण ९६ टक्के भरले .
त्यामुळे वीर धरणाच्या विद्युत गृहातून नीरा नदीत ८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे .