महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
सिनेअभिनेञी दिपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कोविड 19 या गंभीर साथीच्या आजार काळात राज्यातील पोलिस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी शिक्षक यांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करणार असल्याची माहिती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त भाऊसाहेब शिंदे यांनी दिली .
सिनेअभिनेञी दिपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त भाऊसाहेब शिंदे पुढे म्हणाले कि , या ट्रस्टच्या माध्यमातून कोविड-19 या गंभीर साथीच्या आजार काळात गरिब व इतर मुंबई येथील सर्व सामान्यांना किराणा मालासह आर्थिक मदतही केली आहे , यापुढे ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम पोलिस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप ” सिनेअभिनेञी दिपाली भोसले-सय्यद ” यांच्या हस्ते कोल्हापूर येथील इस्तपुरी पोलिस स्टेशन व कुर्डू ग्रामपंचायत आणि येवती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून सुरूवात करण्यात येणार आहे .
यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान योगेश पाटील कुर्डूकर , प्रशांत चुयेकर , विक्की पाटील , राहूल नलवडे , विजय पाटील , सचिन कदम , अमोल पाटील , व निलेश करंडेबेले यांचे सहकार्य मिळणार आहे . असेही चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले .