वाई नगरपरिषदेत कायम कायद्याच्या अभ्यासावर स्थायी समिती पुन्हा खेचून आणली
वाई: वाई नगर परिषद विषय समिती सभापती निवडी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या केसचा निकाल आज लागला.विरोधी पक्षनेते सतीश वैराट यांचा करिष्मा. वाई नगरपरिषदेत कायम कायद्याच्या अभ्यासावर स्थायी समिती पुन्हा खेचून आणली.
त्यामध्ये वाई महाविकास आघाडी च्या सदस्यांनी केलेला विनंती अर्ज विभागीय आयुक्त पुणे यांनी मान्य करून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रांत वाई यांनी मागील विषय समिती निवडी वेळी केलेले कामकाज बेकायदेशीर होते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे इतक्या दिवस रखडलेल्या वाई न.पा च्या विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा घेण्यात येणार असून आरोग्य व पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदी वाई महाविकास आघाडीच्याच उमेदवारांची नेमणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विभागीय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या या निर्णयाचे वाई विकास महाआघाडीच्या सर्व नगरसेवक व हितचिंतकांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे व आयुक्तांचे आभार मानले आहेत.
या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत विरोधी पक्षनेते सतिश वैराट व त्यांचे सहकारी अमजदभाई इनामदार व सर्व सहकारी यांनी महत्वपूर्ण भूमिका पारपाडली, याची प्रशासकीय, राजकीय स्तरावर स्तूती व चर्चा चालू आहे. लवकर मुंबई उच्च न्यायालयाचा पण अध्यक्ष यांच्या केसचा निकाल येणे अपेक्षित आहे. असे यावेळी सांगण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कोणतीही राजकीय सूड बुद्धी न ठेवता फक्त सामाजिक बांधिलकी जपून कार्यरत होतो आणि राहू असे मत विरोधी पक्षनेते व त्यांचे सर्व सहकारी यांनी व्यक्त केले.
अखेर विजय सत्याचाच
वाई न. पा मध्ये स्थायी समितीच्या सर्व सदस्य हे वाई महाविकास आघाडीचे असणार असल्याने नगरपरिषदेत आता नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांना एक हाती निर्णय घेणे सहजासहजी शक्य होणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांना बरोबर घेतल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना कोणताही निर्णय घेता येणार नाही. विरोधी पक्षनेते सतीश वैराट व नगरसेविका सुमैय्या अमजद इनामदार यांच्या राजकीय चाणक्ष बुद्धीने पुन्हा एकदा वाई महाविकास आघाडीचे वर्चस्व त्यांनी वाई न.पा मध्ये सिद्ध केले आहे.




















