महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (महाबळेश्वर)
कोविड 19 चा पार्शवभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या आॅन लाईन अति तातडीच्या विशेष सभेला 12 नगरसेवकांनी विरोध केल्याने ती सभा तहकूब करण्यात आली या संदर्भात नगरसेवक गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी केला.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे अनेकांना बेड उपलब्ध होत नाही काही वेळा आॅक्सीजन बेडची देखिल गरज पडते परंतु तालुक्यात कोठेच आॅक्सीनज बेडची सुविधा उपलब्ध नाही आॅक्सीजन किंवा व्हेंटिलेटरची सोय आपल्या शहरात उपलब्ध व्हावी या संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी नगरसेवकांची अति तातडीची ऑनलाइन सभा आयोजित केली होती या सभेला नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे ,नगरसेवक कुमार शिंदे व युसूफ शेख आदींसह पाच नगरसेवक ऑनलाइन जाॅईन झाले होते परंतु उपनगराध्यक्ष अफजल सुतार , जेष्ठ नगरसेवक किसनराव शिंदे , नगरसेवक संदीप साळंुखे , प्रकाश पाटील , संजय पिसाळ , नासिर मुलाणी , रविंद्र कंुभारदरे यांच्यासह पालिकेतील 12 नगरसेवकांनी ऑनलाइन सभेस विरोध करणारे सर्वांच्या सहीचे एक निवेदन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचेकडे दिले या पत्रात नगरसेवकांनी म्हटले आहे की अशा प्रकारे सभेला उपस्थित राहण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नगरसेवकांना दिले गेले नाही तसेच ई विषयाची तसेच त्यावर चर्चा करणे मत मांडणे याची माहीती नाही या शिवाय आपल्या कडे नेटवर्कचीही समस्या मोठी आहे तेव्हा ऑनलाइन सभा रद्द् करावी व ऑफलाइन सभा आयोजित करावी अशी मागणी 12 नगरसेवकांनी निवेदना व्दारे केली या पत्राने ऑनलाइन सभा तर रद्द् झालीच परंतु पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली
सभा रद्द् झाल्या नंतर या बाबत आपली भुमिका मांडण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे पत्रकार परिषद घेवुन ऑनलाइन सभेस विरोध करणारे नगरसेवकांच्या भुमिकेचा समाचार घेतला महाबळेश्वर तालुक्यात दोन कोरोना केअर सेंटर आहेत या ठिकाणी 70 बेड उपलब्ध आहेत परंतु एकही आॅक्सीजन बेड अथवा व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध नाही या सुविधे अभावी काही रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही रूग्णांना आपला तालुका सोडुन इतर जिल्हयात जावे लागले काही रूग्णांनी खाजगी रूग्णालयात उपचार घेतले परंतु सर्व सामान्या महाबळेश्वर करांना महागडे उपचार परवडणारे नाहीत म्हणुन अशा सर्व सामान्य महाबळेश्वर करांना आपल्या शहरातच अशा प्रकारची सुविधा मिळावी या बाबत जिल्हाधिकारी यांनी पालिकेला सुचना केल्या होत्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सुचनेच्या आधारे पालिकेची आॅन लाईन सभा घेतली होती महत्वाचा विषय होता आणि सर्वांना विश्वासत घेवुनच हा निर्णय आपल्याला घ्यायचा होता परंतु प्रत्येक विषयाचे राजकारण करणारांना हे ही लक्षात आले नाही की आपण किती गंभिर विषयाचे राजकारण करीत आहोत ते विरोधासाठी विरोध करण्याच्या भुमिकेमुळे हे नगरसेवक तोंडघशी पडले आहेत आता भविष्यात जनताच या सर्वांना त्यांची जागा दाखवुन देईल असा सणसणीत टोला नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी लगावला आहे
ऑनलाइन विरोध करणारे निवेदनावर ज्यांनी सहया केल्या आहेत त्यातील जेष्ठ नगरसेविका विमलताई पार्टे या सध्या पुण्यात आहेत परंतु त्यांचीही या निवेदनावर सही आहे ती सही नक्की कोणी केली हे लवकरच समजेल त्याच प्रमाणे जेष्ठ नगरसेवक नासिर मुलाणी यांची व त्यांच्या नगरसेविका पत्नी जुबेदा मुलाणी यांची देखिल सही आहे नासिर मुलाणी यांना कोरोनाची बाधा झाली होती सध्या ते ज्या ठिकाणी होम आयसोलेशन मध्ये रहात आहेत तो भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे तरी देखिल तेथिल त्यांचे हाॅटेल बगिचा कसे काय चालु आहे असा प्रश्न नगराध्यक्षा यांनी उपस्थित केला नासिर मुलाणी यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली परंतु आपल्या पत्नी आई मुले पुतणे यांची कोणाचीही कोरोना चाचणी केली नाही या वरून त्यांना कोरोना बाबत किती गांभिर्य आहे हे लक्षात येते नगरसेवकच जर असे बेजबाबदारपणे वागत असतील तर जे जनतेचे काय रक्षण करणार आणि जनतेला काय मार्गदर्शन करणार असा सवाल करून अशा लोकप्रतिनिधीं बाबत जनताच समाचार घेईल असा विश्वासही नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी व्यकत केला

आपले शहर हे पर्यटन स्थळ आहे तब्बल सात महीन्या नंतर येथे पर्यटकांची पाउले पडत आहेत हळु हळु लोकांना रोजगार मिळणार आहे म्हणुन या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे ही जबाबदारी सर्वस्वी पालिकेची आहे म्हणुनच ही तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत महत्वाच्या विषयावर निर्णय होणे अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने ते झाले नाही सभेत निर्णय झाला नसला तरी महाबळेश्वर करांना आॅक्सीजन बेडची सुविधा मिळायलाच हवी ही आपली भुमिका आहे आणि त्या साठी आम्ही आमच्या पातळीवर निर्णय घेवुनच महाबळेश्वर करांना लवकरच आॅक्सीजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा मिळवुन देवु असा निर्धारही नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी व्यक्त केला या वेळी त्यांचे पती नगरसेवक कुमार शिंदे हे देखिल उपस्थित होते





















