महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड येथील जोतिर्लिंग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली.संस्थेच्या चेअरमनपदी जयंवत पांडुरंग पाटील व व्हा.चेअरमनपदी दिलावरहुसेन अब्बास शेख यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित संचालकांमध्ये तज्ञ संचालक अरुण पांडुरंग पाटील(काका), संचालक सर्वश्री दिग्विजय अरुण पाटील, तानाजी मारुती पवार, प्रकाश मारुती जाधव, विलास बंडू काटकर, विठ्ठल लक्ष्मण पाटील, शब्बीर गुलाब भालदार, विजयकुमार शामराव जाधव, प्रमोद लक्ष्मण थोरवडे, भगवान गणपती येडगे, सौ.सुमन शिवाजी सुर्यवंशी, आशालता राजाराम जगताप यांचा समावेश आहे.नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी संचालकांसह कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष शामराव पाटील उपस्थित होते.


































