महाराष्ट्र न्यूज मलकापूर प्रतिनिधी :
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या पार्श्वभूमीवर कोयना औद्योगिक वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह, खाजगी संस्था, गृहनिर्माण संस्था यांचेमार्फत शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम, श्रमदान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महिला बचतगटामार्फत प्रभाग क्रमांक ३, ६ आणि रोटरी क्लब मार्फत प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून श्रमदान करण्यात आले. त्याच प्रमाणे कोयना औद्योगिक वसाहत मार्फत प्रभाग क्रमांक ८ मध्ये औद्योगिक वसाहत क्षेत्रात रस्ते सफाई तसेच स्वच्छता करुन श्रमदान करण्यात आले.
कोयना औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रामसिंग बाबुराव सांडगे, उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ पेडणेकर, सचिव नितीन तानाजी सांडगे यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिक या मोहिमेत उपस्थित होते.




















