फलटण प्रतिनिधी…..
होळ ता फलटण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस राजे गट पार्टीचे माजी जिल्हा युवक उपाध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कुमार कांबळे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली असून त्यांच्याबरोबर
होळ गावातील अजित भोसले ,आप्पा नानाभोसले,पोपट गाढवे,धनंजय जाधव,सुरेश सिताराम भोसले,जाडकर नाना,माऊली गायकवाड,गणेश गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे




















