महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विंग (ता खंडाळा) गावच्या हद्दीतील झालेल्या कंपन्यांनी नियमबाह्य बांधकाम करून ग्रामस्थांचे नियमित रस्ते बंद करण्याच्या मार्गावर आणले आहेत. प्रशासनाने ताबडतोब हस्तक्षेप करून रस्ते खुले करण्याची व अनधिकृत रस्त्यात आलेले बांधकाम हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन उभारावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
विंग (ता खंडाळा) गावच्या हद्दीत नव्याने अजय पोली, अजय पाइप, वैशविक फुड्स, ऍग्रो पियर, यूजीसी या कंपन्यांनी आपले बांधकाम करताना नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केले आहे. हे बांधकामामुळे तळेकर वस्ती ते विंग गावांमध्ये जाणाऱ्या रोडवर बैलगाडी ही जाऊ शकत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. तसेच या कंपन्यांमध्ये येणाऱ्या कामगारांच्या व विजिटर लोकांच्या गाड्या तसेच याच कंपनीतील मालवाहतूक करणारे कंटेनर चे पार्किंग ही रस्त्याच्या कडेलाच केले जात असल्यामुळे गावामध्ये जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तसेच रस्त्यावरील पार्किंग संदर्भात गावातील लोकांनी विचारपूस केल्यास कंपनीच्या व्यवस्थापनाकडून, सुरक्षा राक्षकाकडून स्थानिक ग्रामस्थांना दमदाटी व गुन्हा दाखल करण्याची पोलिसात तक्रार करण्याची भाषा वापरली जाते. या कंपन्यांच्या नियमबाह्य बांधकामामुळे व गाड्यांच्या पार्किंग मुळे बरेचदा गावकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. तरी संबंधित कंपन्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात गावकर्यांचा उद्रेक होऊन या कंपन्यांच्या विरोधात गावकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलनही करणार असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.






















