प्रतिनिधी फलटण
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी एक जागा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना साठी सोडली होती जयंत पाटील यांनीही राजू शेट्टी यांच्याकडे निरोप पोहोचवला होता अशी चर्चा होते परंतु त्या नुसार आज बारामती येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन स्वाभिमानीचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीने दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारली आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा मा.शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रियाताई सुळे ,स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. राजेंद्र ढवाण पाटील, शेतकरी संघटनेचे नेते सतीश भैय्या काकडे , डॉक्टर. महाविर अकोळे हे उपस्थित होते
त्यानुसार आता खासदार राजू शेट्टी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा आता थेट विधान सभेत घुमणार हे आता निश्चित झाले आहे यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना मध्ये ऊसाहचे वातावर निर्माण झाले आहे तसेच महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या च्या हक्कासाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता हत्तीचे बळ मिळणार आहे या निर्णयाचे स्वागत सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केले आहे.