ओझर्डे : वार्ताहर: दिनांक १६ वाई तालुक्याच्या पूर्व भागातील वेळे गावामधील सामाजिक माऊली पतसंस्थेचे संचालक, वाई तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य असलेले आणि करुणा मंदिर येथील विश्वस्त व सोळशी तालुका कोरेगाव येथील प्रसिद्ध शनेश्वर देवस्थानचे सचिव आणि वेळे गावाचे सामाजिक कार्यकर्ते व वाई तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष असलेले डॉक्टर अशोक साहेबराव कदम वय 48 यांचा कोरोनो रोगाच्या संसर्गामुळे आज मंगळवार दिनांक १६ रोजी मृत्यू झाल्याने वेळे गावावर शोककळा पसरली आहे.त्याच्या या अकाली निधनामुळे वाई तालुक्यासह वेळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेळे ता. वाई येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले डॉ. अशोक कदम यांना दिनांक ९ रोजी अचानक त्रास होत असल्याने त्यांना सातारा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दुर्दैवाने दिनांक १० रोजी त्यांचा कोरोनो पाँझीटीव्ह अहवाल आल्याने त्याचा धसका त्यांनी घेवून उपचारादरम्यान त्यांचा आज शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यांचा भावाचाहि कोरोनो पाँझीटीव्हरिपोर्ट आल्याने त्याच्यावर सध्या सातारा येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. अशोक कदम यांचा कोरोनोसारख्या रोगाने मृत्यू झाल्याने परिसरातील सर्व स्तरातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे जाण्याने सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.चौकट : आईने केली मात मात्र मुलाने घेतला कोरोनोचा धसकाडॉ. कदम व त्यांचे भाऊ हे आपल्या आजारी असलेल्या आईला भेटायला पिंपोडे ता. कोरेगाव येथील खाजगी दवाखान्यात गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या ८५ वर्षीय वयोवृद्ध आईची सेवा करीत असताना आईच्या संपर्कात आले होते. तद्नंतर पिंपोडे येथील आई उपचार घेत असलेले खाजगी रुग्णालय सील करण्यात आले होते व आईसह दोन्ही भावांची कोरोना चाचणी केली असता दोन्ही भावांचे अहवाल पाँझीटीव्ह आले व ८५ वर्षीय वयोवृद्ध व आजारी असलेल्या आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. परंतु डॉ. कदम यांनी कोरोनोचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला . त्यांचे बंधू रुग्णालयात कोरोनोशी अजून लढत आहेत.