वाई : रुद्र शंभो प्रतिष्ठानचे संस्थापक युवा उद्योजक अल्पेश कांबळे यांचा मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत बीपी शुगर टेस्ट, व अल्पदरात चष्म्यांचे वाटप अशा विविध सामाजिक व विधायक उपक्रमांनी संपन्न झाला.
या उपक्रमांचा लाभ जवळपास 200 हून जास्त नागरिकांनी घेतला. या उपक्रमासाठी एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांचे डॉ. राहुल धूत, योगेश खरात, सोनाली शिंगटे यांच्या माध्यमातून शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले. या उपक्रमांना आ. मकरंद पाटील ,वाई चे नगराध्यक्ष अनिल सावंत, मावळा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुभेदार मालुसरे, गौरव कांबळे, अजित शिंदे, प्रसाद देशमुख, दिलीप बाबर, आहान मकरंद पाटील युवा मंच व महाराणा प्रताप मंडळ यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार मकरंद पाटील व नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अल्पेश कांबळे यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना आमदार मकरंद पाटील म्हणाले अल्पेश कांबळे यांच्या कुटुंबाचा माझा संबंध मी लहान असल्यापासूनचा आहे. अल्पेश आणि माझा मुलगा आहान हे चांगले मित्र आहेत. अल्पेशला त्याच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. चांगले काम करणाऱ्यांना कोणाला काही मागण्याची गरज नसते त्यांना समाजाकडून भरभरून मिळत असते. मी जसे सामाजिक कार्य सुरू केले होते तेच कार्य अल्पेश निही सुरू केले आहे. याचा मला अभिमान वाटतो आहे व अल्पेशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.