महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(महाबळेश्वर)
कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट् ही मोहीम सुरू केली आहे या मोहीमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजारपेठेतील व्यापारी कुटूंबाची वैदयकिय तपासणी करून करण्यात आली या वेळी नागरीकांनी या मोहीमेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय जाहीर केला या मोहीमेचा शुभारंभ पालिकेच्या वतीने करण्यात आला या मोहीमेची माहीती देताना मुख्याधिकरी म्हणाल्या की या मोहीमे अंतर्गत शहरातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच जेष्ठ नागरीकां मधील कोविडची लक्षणे शोधुन त्यांना तातडीने उपचार मिळवुन देणे तसेच कोविड रूग्णांनी नंतर कोणती काळजी घ्यायची या बाबतीत नागरीकांचे आरोग्य प्रबोधन करणे अपेक्षित आहे या साठी दोन टप्यात ही मोहीम राबविली जाणार आहे या मोहीमेचा पहीला टप्पा आज पासुन सुरू करण्यात आला आहे तर दुसरा टप्पा 14 आक्टोंबर पासुन सुरू करण्यात येणार आहे या मोहीमे अंतर्गत शहरातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन ही माहीती राज्य शासनाने दिलेल्या अॅप मध्ये नोंद करण्यात करण्यात येणार आहे अशी माहीती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली
नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक वार्डात पथकाची नेमणुक केली आहे या पथका मध्ये प्रशिक्षित पालिका कर्मचारी , स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे हे पथक नागरीकांचे तपमान व त्यांच्या ऑक्सीजनची लेवल यांची तपासणी करणार आहेत नागरीकांनी या मोहीमेला सहकार्य करावे आपल्या घरी आलेल्या पथकाला सर्व माहीती दयावी काही माहीती लपवु नये तसेच या मोहीमेची कोणतीही भिती बाळगु नये हीमोहीम आपल्या साठीच असुन आपण व आपले कुटूब यांची जबाबदारी आपली आहे
याबाबत नागरीकांचे आरोग्य प्रशिक्षण घेवुन त्यांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे कोविडची बाधा होवू नये तसेच कोविड रूग्णानी व कोविड मधुन मुक्त झालेल्या रूग्णांनी पुन्हा कोविड बाधा होवु नये यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यायची याची सर्व माहीती पथका कडुन नागरीकां पर्यत पोहचविली जाणार आहे या साठी पालिकेने नेमलेल्या पथका मधील सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहीतीही मुख्याधिकारी यांनी दिली























