महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील माने पेट्रोलियम येथे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवार, दि. १०/१०/२०२० रोजी भाजप पदाधिकारी समवेत आढावा बैठक घेतली. यासमयी कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती व उपाय योजना तसेच मराठा आरक्षण ऊसाच्या तोडणी संदर्भात व सणसर जिल्हा परिषदेच्या गणातील अडचणी समजावून घेऊन त्याविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने , तानाजीराव थोरात, बाळासाहेब डोंबाळे, रामभाऊ पाटील, शहाजी शिंदे, लालासो सपकळ, शरद जामदार, संग्राम निंबाळकर, नितीन माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















