महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंद्राणी बालन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने व सकाळ सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने देण्यात आलेल्या ५७ सायकलींचे वितरण महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली येथे आज करण्यात आले . इंद्राणी बालन फाउंडेशन व सकाळ या दोन्हींच्या माध्यमातून समाजासाठी विविध उपक्रम राबवले जातात . त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे . त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या या सायकलीमुळे दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची येण्या- जाण्याची सोय होणार असून , त्यांचा वेळही वाचणार आहे . तो वेळ त्यांनी अभ्यासासाठी वापरावा तसेच सायकल चालवल्यामुळे आरोग्य देखील उत्तम राहते . असे सांगून ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो , संपत्ती कमवतो त्या संपत्तीचा काही भाग समाजासाठी खर्च केला पाहिजे . अशी दानशूर माणसे क्वचितच पाहायला मिळतात . त्यापैकीच बालन उद्योग समूह आहे . असे सांगून कुरवली विद्यालय हे अल्पावधीतच नावारूपाला आलेले विद्यालय असून , विद्यालयाने गुणवत्तेच्या बाबतीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे . आणि त्यामुळेच विद्यालयातील प्राचार्य शिक्षक वृंदाने पालकांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केलेले आहे . असे मत व्यक्त केले .
सकाळचे पत्रकार राजकुमार थोरात यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या या सायकलींमुळे वाड्या , वस्ती वरून येणाऱ्या मुलांची येण्या-जाण्याची सोय होणार असून विद्यार्थ्यांसाठी सकाळ नेहमीच विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले . हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यां समवेत सायकल चालवण्याचा आनंद घेतला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य गणेश घोरपडे यांनी केले . यावेळी संस्थेचे सचिव किरण पाटील , उदयसिंह पाटील , विलासराव माने , तानाजीराव थोरात , मनोज पाटील , स्वप्नील घोगरे , प्रसाद पाटील , अँड.शरद जामदार , संग्रामसिंह निंबाळकर , विजय पांढरे , रामभाऊ पाटील , लालासाहेब सपकळ , बापूराव पांढरे , स्वप्नील माने , दीपक कदम , हरीतात्या माने , रवींद्र यादव , सतीश चव्हाण , अंकुश भंडलकर , दिलीप भोसले , संतोष चव्हाण , चंद्रकांत भोसले , आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार तर आभार महेमूद मुलाणी यांनी मानले .