महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:(सुगांव- इंदापूर)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,संलग्नित श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव, येथील कृषिकन्या कुमारी ननवरे प्रियंका परमेश्वर ह्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम(2020-21) अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत. यामध्ये निराळे कृषी सल्ले ,पीक प्रात्यक्षिक, चर्चासत्र माती-पाणी परीक्षण ,जनावरांचे लसीकरण असे उपक्रम राबवत आहेत.
वेगवेगळ्या उपक्रमातील आज एका उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले. आज या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व पटवून दिले. माती कशी गोळा करायची ,कुठे परीक्षणकरायला द्यायची याची माहिती दिली.सदर विद्यार्थिनीला श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी हाके ,कार्यक्रम अधिकारी व कार्यक्रम समन्वयक धीरज दोरकर ,विषय तज्ञ शिक्षका शिक्षिका रूपाली घोगरे यांनी मार्गदर्शन केले.