महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
महाराष्ट्र सँम्बो असोसिएशनचे सचिव अनुप नाईक यांनी सातारा जिल्हा संघटनेला मान्यता देत पदाधिकारी निवड केली. सँम्बो हा खेळ मार्शल आर्ट रिलेटेड आहे, जुडो ,कुस्ती आणि मार्शल आर्ट या तिन्ही खेळांचा संगम आहे,या खेळाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी( IOC ) आणि ऑलिम्पिक कौन्सिल of एशिया ( OCA )ची मान्यता आहे तसेच या खेळाचा एशियन गेम मध्ये समावेश असून आत्ता झालेल्या एशियाड मध्ये भारताचा संघ सहभागी झाला होता, भारतामध्ये या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी indian olimpic असोसिएशन ने मान्यता दिली आहे , नोकरी आरक्षण 5%राखीव जागा आहेत
दि.13 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हा धर्मादाय आयुक्त यांचेकडून सँम्बो असोसिएशन सातारा या संघटनेला नोंदणी मिळाली असुन प्रा.पै.अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदी रेठरे खुर्द ता.कराड येथील सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटक आणि ऑलिम्पिक वीर पै खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार विजेते विनोद शिंदे ,उपाध्यक्षपदी रमेश संपतराव थोरात, सचिवपदी पै .अमोल शंकर नारळे, खजिनदार प्रा.दिगंबर लक्षण सुतार, सदस्यपदी विनोद विलास कदम, प्रशिक्षक आणि सदस्य सुलतान मुबारक मुजावर यांची निवड झाली आहे.






















