महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
मंगळवार, दि.६/१०/२०२० रोजी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भरणेवाडी येथील दिपक कैलास गायकवाड यांच्या वडिलांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने त्यांच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन केले.
कैलास गायकवाड हे भरणेवाडी मधील एक आदर्श व्यक्ती होते. समाजाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. सहज बोलण्याची पध्दत, समाजात वावरताना असतानारी नम्रता यामुळे त्यांना भरणेवाडी पंचक्रोशीत सर्वजण ओळखत होते.
‘ एक मरणाची सरे उत्तमची उरे किर्ती मागे ‘ अशा शब्दांत राजवर्धन पाटील यांनी कैलास गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करून, गायकवाड कुटुंबाला या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली































