महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा :
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे व्याख्यानमाला सन २०२० – २१ वर्षाची व्याख्यानमाला बुधवार दि १० फेब्रुवारी ते दि १२ फेब्रुवारी पर्यंत होणार आहे . हे या व्याख्यानमालेचे १० वर्ष असून गिरिस्थान नगरपरिषद पांचगणी , ज्येष्ठ नागरिक संघ पांचगणी ,पांचगणी पोलीस स्टेशन , इनरव्हील क्लब ,माजी विध्यार्थी संघटना श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज पांचगणी ,सरकारमान्य सार्वजनिक वाचनालय पांचगणी आणि विठ्ठल मंदिर यांच्या सौजन्याने पांचगणी क्लब , बेबी पॉईंट पांचगणी येथे पार पडणार आहे .
या व्याख्यानमालेला प्रा .अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष . स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर , बाळासाहेब भिलारे , साहेबराव बिरामणे , राजेंद्रशेठ राजपुरे , नानासाहेब कासुर्डे ,डॉ.सुधीर बोधे ,किशोर पुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले आहे .
बुधवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या वर्षीच्या प्रथम पुष्प इंद्रजीत देशमुख शिवम प्रतिष्ठान ,कराड हे ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार – जगण्याचा मूलमंत्र या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे. गुरुवार दि. ११ फेब्रुवारी रोजा सायंकाळी ४ वा द्वितीय पुष्प प्रशांत देशमुख प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रतापगडचे युद्ध या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे .
तृतीय पुष्प शुक्रवार दि १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा प्रा.लता ऐवळे प्रसिद्ध कवयित्री, सांगली बंध नात्यांचा – गंध कवितांचा या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे




















