महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
दिव्यांग बांधवांना कराड येथील दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगबांधवांना या ही वर्षी दिवाळी साहित्य,निधीचे वाटप करण्यात आले.दिव्यांग सेल,राष्ट्रवादी काँग्रेस’चे जिल्हाध्यक्ष प्रविण साबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील,प्रमुख पाहुणे आमदार बाळासाहेब पाटील,संगिता(माई)साळूंखे,सौ.वनिता मोरे,सौ.सुनिता भोसले,विजय लिगाडे,प्राचार्य कणसे’सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण साबळे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांनी दिव्यांगबांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच विविध वस्तुंचे वाटपदेखील करण्यात आले.सातारा जिल्ह्यातून विविध भागांतून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला सौ.वनिता मोरे यांच्या दुर्वा महिला उद्योगाच्या वतीने’देखील विशेष वस्तूंची मदत देण्यात आली.तसेच लिगाडे-पाटील कॉलेज’चे विजय लिगाडे यांचेवतीने रु.२५,०००/-चा धनादेश दिव्यांगबांधवांना देणेत आला.आमदार पाटील व सचिव जयंत’काका पाटील यांचेकडून ही रोख रक्कम देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.दिपक तडाखे यांनी केले व आभार शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक बी.बी. साळूंखे’सर यांनी मानले.




















