महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बारामती सुनील निंबाळकर :
नुकतीच बारामती येथे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष लेखक जयप्रकाश घुमटकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना त्यांनी साहित्य,कला या क्षेत्रात भरीव काम करण्याच्या संधी आहेत.आपले क्षेत्र ग्रामीण भागातील कवी,लेखक,नाट्य,साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यकांना घेऊन काम करणारे आहे.आपण ठरविले तर नक्कीच आपले साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन आपल्या मराठी साहित्याचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत.या क्षेत्रात ग्रामीण साहित्यकांनी मनापासून काम करण्याची गरज आहे.
भारतीय साहित्याला जगाच्या पाठीवर अनन्य साधारण महत्व आहे.याच हेतूने आपण बारामती तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या व्यक्तींची निवड केली आहे.यासाठी हर्षदा झगडे जिल्हा अध्यक्षा यांनी शिफारस करून सक्षम कार्यकारिणी निवड झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले.यापुढे आपले कार्यच आपल्या मंडळाची दिशा ठरविणार आहे.
मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खालीलप्रमाणे तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करत असल्याचे जाहीर केले.
साहित्य मंडळाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून सौ.अर्चना प्रकाश सातव,सौ.दीपाली मिलन साळुंखे सरचिटणीस सचिन हनुमंत खलाटे,सदस्य रामराजे मारुती घोरपडे,संजय बाबुराव मोरे,पूजा पंजाबराव मोरे शहर उपाध्यक्ष म्हणून सौ.विद्या रमेश जाधव,सौ.विजय यशवंत चांदगुडे सदस्य म्हणून सौ.अलका शरद रसाळ,डॉ.हिमगौरी सतीश वडगांवकर,सौ.संगीता सुरेश पांढरे,मेराज मोहंमद सलीन बागवान या सर्व व्यक्तींची निवड करून यावेळी सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिताताई गवांदे,सरचिटणीस सोनमताई ठाकूर,जिल्हा अध्यक्ष हर्षदा झगडे यांनी विशेष शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.