श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ता.बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी उद्या दिनांक २७ जानेवारी रोजी ऊस वाहतुक संघटना यांनी पुकारलेला बंद चेअरमन , संचालक मंडळ,वाहतुक संघटना पदाधिकारी यांच्या चर्चे नंतर अखेर मागे…पुरुषोत्तम जगताप,चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना*… *सुनिल निंबाळकर, बारामती प्रतिनिधी*
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये आज आखेर ५.३७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून अजून ७ ते ७.२५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करावयाचा आहे यावर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न कारखान्यासमोर असून वेळेत काम पूर्ण करणे जिकरीचे होणार आहे कारखाना सध्या सहा हजार ते सहा हजार तीनशे मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेने गाळप करीत असून अतिरिक्त ऊस इतर कारखानदारांना देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यासाठी लागणारा पत्रव्यवहार देखील केलेला आहे असे असताना कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीचे काम सांभाळणाऱ्या श्री सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने दोन वेळा निवेदन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला ऊस वाहतुक दरवाढ मागणी करण्यासाठी चे पत्र देण्यात आले होते व दरवर दरवाढ न दिल्यास दिनांक २७ जानेवारी २०१९ पासून ऊस वाहतूक बंद करण्यात येईल असे पत्र कारखान्यात दिले होते यावर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळ तसेच वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्यांशी काल दिनांक २५ जानेवारी रोजी एकत्रित चर्चा करून यावर तोडगा निघालेला आहे व उद्या दिनांक २७ जानेवारी रोजी होणारा वाहतूक संघटनेचा संप मागे घेण्यात आला असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी महाराष्ट्र न्यूज बोलताना सांगितले.