महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीने महावितरण विरोधात ‘टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. महावितरणाचे ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रीतील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले .
यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, दक्षिण अध्यक्ष धनाजी पाटील , उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी , सरचिटणीस राहुल भिसे, प्रमोद शिंदे, युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन पाटस्कर , युवा मोर्चा कराड अध्यक्ष विशाल कुलकर्णी महिला मोर्चा अध्यक्ष सीमा घार्गे , महिला मोर्चा सरचिटणीस धनश्री रोकडे महिला मोर्चा उत्तर उपाध्यक्ष नम्रता कुलकर्णी , कामगार आघाडी,अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक कराडे , ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे ,ओबीसी आघाडी शहराध्यक्ष उल्हास बेंद्रे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .






















