महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याचे लाॅकडाऊन ३१ जुलै पर्यंत आहे , या लाॅकडाऊनमध्ये , त्यानंतर वाढ केल्यास इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लाॅकडाऊनचे नियम तोडतील , असा सज्जड इशारा प्रशासनाला इंदापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी दिला आहे .
तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक इंदापूर येथे मंगळवारी , दि . २८ जुलै रोजी पार पडली , यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की , प्रशासनाने आता कोरोनाची भिती दाखविण्यापेक्षा जनतेला कोरोनासोबत जगण्यासाठी तयार करण्याची गरज आहे .या बैठकीत प्रथमतः समता सैनिकचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक व प्रचार प्रसार , पर्यटन पुणे विभागाचे उपाध्यक्ष दिलीप सरोदे यांचे चिरंजीव सिध्दार्थ सरोदे यांचे निधन झालेने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .