महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील मराठी पदवी ,पदव्युत्तर अध्यापन व संशोधन विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ.रेश्मा दिवेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या मराठी शिक्षक संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून (सन २०२१ ते २०२४) निवड करण्यात आली.तासगाव येथे पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कार्यकारिणीचे अधिवेशन झाले.
या अधिवेशनात डॉ.रेश्मा दिवेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही मराठीच्या प्राध्यापकांची नोंदणीकृत संघटना असून महाराष्ट्रात आणि देशातील ती एक कार्यक्षम संघटना आहे. रेश्मा दिवेकर या पदवी व पदव्युत्तर वर्गांना गेली सोळा वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. २०१ ९ चा शिक्षण मंडळ कराड यांचा आदर्श प्राध्यापक पुस्कार मिळाला आहे. त्या एम.फिल., पीएच.डी च्या संशोधक मार्गदर्शक आहेत.त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.विविध महाविद्यालयात सामाजिक विषयावर त्यांनी अनेक व्याखाने दिलेली आहेत.
त्यांची या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने, उपप्राचार्य संभाजी सावंत, उपप्राचार्य एस.ए. पाटील, उपप्राचार्या माधुरी कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.रमेश पोळ, प्रा.डॉ. तानाजी पाटील, प्रा.डॉ. प्राजक्ता निकम, सिनिअर व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






















