स्वतः देवानेच पोलीस रूपात जिव वाचवला
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: घशाच्या कॅन्सरसाठी झगडत आजार कंटाळून जीव द्यायला निघालेल्या आजीला 85 वर्षाच्या आजीला जीव निघालेल्या स्वतः देवानेच पोलीस रूपात जिव वाचवला
लोकांच्या सुरक्षिते साठी पोलीस यंत्रणा रात्रौ दिवस सेवा बजावत असतात ,मंग ऊन ,वारा ,पाऊस काही असो ,हे सेवा सुरू असतात .दि 23/05/2021 रोजी रात्रौ 02.00 वा सुमारास एक वयोवृद्ध महिला वय 85 वर्ष यांना घशाचा व तोंडाचा कॅन्सर असल्याने त्या कॅन्सरशी झगडत आहेत. परंतु वयोमानानुसार ते आता सहन करू शकत नाही. रात्री अचानक तोंडाच्या व घशाचा कॅन्सर च्या असह्य वेदना होऊ लागल्या. आजीला वेदना सहन होत नव्हत्या. घरातील मुलगा झोपला होता .आजीला वेदना सहन होत नसल्याने ,त्यांनी मुलाची नजर चुकवून घराबाहेर पडल्या. वारुंजी फाटा ते कोयना फुल याच्यामध्ये अंतर फार थोडे आहे. आजींनी वेदना सहन होत नसल्याने शेवटी कोयनेचे नदीपात्रात उडी मारून , वेदनेपासून सुटका करण्याची विचार केला . वेदना त्यामुळे थांबू देत नव्हते ,परंतु हे देवाला मंजूर नव्हते. रात्रीचा देवाला रूप घ्यायचा पोलिसाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याचवेळी रात्रगस्त करत असलेले कराड शहर पोलीस ठाण्याचे मिनी बसवरील चालक व पेट्रोलिंग अमलदार इनामदार हे पेट्रोलिंग करत एक्सप्रेस ने वारुंजी ला जात होते. त्यांना एक्सप्रेस वर आजी पुलावर एकटीच उभी असल्याची दिसली. आजी काही तर करण्यात येत असताना पोलिसांनी तिला आवाज दिला. तिला थांबायला सांगितले.
आजी थांबायला तयार नव्हती. पोलिसांनी सांगितले थोडा आमच्याशी बोला. आजी बोलायला तयार झाली. आणि पोलिसांना व त्याच्या रूपातील देवांना यश आले .आजीला जिव न दयावा यासाठी पोलिसांनी प्रवृत्त केले . तिला प्रेमाने पोलीस स्टेशन ला घेऊन आले. आपुलकीने विचारपूस करून ,पाणी देऊन तिच्या घरचा पत्ता घेतला .तिची असं योजना बद्दल माहिती घेतली .वैद्यकीय उपचारपद्धत फार मोठी झालेली आहे. तुम्ही बरे होणार हा विश्वास दिला . त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून घरी संपर्क करून मुलाला बोलावून घेतले .व आजीला सुखरूप घरी पोहोचलो . जीवन देणारा पोलिस म्हणुन देवचं आला मदतीला धावुन या प्रकरणाने कराड शहर पोलिसांना चे कराड चा नागरिकांमध्ये कौतुक होत आहे