महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फलटण
कोळकी ता. फलटण येथील बहुप्रतिक्षित पोलीस दूरक्षेत्रासाठी तीन गुंठे जागा निश्चित करण्यात आली आहे. कोळकी मध्ये फलटण दहिवडी रस्त्यावर आरोग्य उपकेंद्रा लगत ग्रामपंचायत मालकीची जागा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आली आहे. या दूरक्षेत्र साठी एक कोटी रुपये मंजूर झाले असून सुमारे 400 चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत या ठिकाणी उभी करण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे ,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण ,प.सं.सद्यस सचिन रणवरे ,पुंडलिक नाळे, वैभव नाळे, प्रशासक एल.एच. निंबाळकर आदी उपस्थित होते
फलटण उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कार्यालय, शहर पोलीस ठाणेलगत बहु उद्देशीय सभागृह, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, शिरवळ व सुरवडी पोलीस ठाणे आणि कोळकी व हनुमंतवाडी येथे पोलीस दुरक्षेत्र इमारती उभारणे कामी 17 कोटी 35 लाख रुपयांची आर्थिक तरतूद नुकतीचकरण्यात आली आहे. कोळकी मध्ये पोलीस दूरक्षेत्र व्हावे यासाठी स्थानिक कार्यकर्ते गेली दहा वर्ष प्रयत्न करीत होते.