*लोकसेवा प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन अनेक ठिकाणी झाडे लाऊन, झाडे वाटून साजरा करण्यात आला. दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणंद पोलीस स्टेशन परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.विशाल वायकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मालोजीराजे विद्यालयाच्या प्राचार्य.सौ. सुनंदा नेवसे या उपस्थित होत्या ,मालोजीराजे विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य सुनंदा नेवसे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच अंगणवाडी सेविकांना झाडांचे वाटप ही करण्यात आले ,(पेरु, गुलाब, लिंब, गुलमोहर, पिंपळ,मोगरा, बदाम, पारिजात इ.झाडांच्या प्रजाती लावण्यात आल्या. पंजाब काॅलनी परिसरात, इंदिरा नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, परिसरातील अनेक जणांना झाडाचे वाटप करण्यात आले,श्री.भैरवनाथ डोंगरावर प्रतिष्ठान च्या वतीने लिंब, पिंपळ, गुलमोहर, जंगली इ.झाडे लावण्यात आली एकूण 80/85झाडे लावण्यात ,वाटण्यातआली, झाडे दान करणाऱ्यांचे आभार ,तुषार गवळी, गणेश माने बापू गायकवाड,मामा यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्टानच्या पदाधिकारी, सभासदांनी परिश्रम घेतले.