ओंकार पोतदार/ओझर्डे प्रतिनिधी दि.18
सातारा पुणे महामार्गा वरील अनवडी गावच्या हद्दीतून मतील सद्दिक मंगा वय 35 राहणार मारुती मंदिर रत्नागिरी हे चालक मालक असलेले आपली कार क्रमांक MH.10.C.A.7855 मधून पुणे येथून रत्नागिरी कडे जात असताना त्यांची कार महामार्गा वरील अनवडी गावच्या हद्दीत सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आली असता कारच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक पुढील बोनेट मधून धूर निघत असल्याचे कार चालक मतील मंगा याना दिसून आल्याने त्यांनी भरधाव वेगाने धावत असलेली आपली कार रस्त्याकडेला थांबवून ते बाहेर पडले व बोनेट मधून धूर का निघत आहे. ते पाहण्यासाठी गेले असता कारने अचानक पेट घेतला पेट घेतलेल्या या आगीने रुद्र रूप धारण केले होते. त्यामुळे कार चालक भयभीत झाले होते. सुदैवानी यात कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु कारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गा वरील अनवडी गावच्या हद्दीत एका कारने अचानक पेट घेतला याची माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि शाम बुवा यांना मिळताच त्यांनी भुईंज पोलिस ठाण्यातील हवलदार रविराज वर्णेकर, एस. जी. घाडगे, संजय वाघ, अहमद शेख, दत्तात्रय धायगुडे या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने घटना स्थळावर जाण्याचे आदेश दिले होते. तोपर्यंत सपोनि शाम बुवा यांनी किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमक दलाशी संपर्क साधून कारला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने पाचारण केले. ही घटना दिनांक 18 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटनास्थळी किसनवीर कारखान्याचा अग्निशामक बम दाखल झाला तोपर्यंत कारला लागलेल्या आगीने रुद्र रूप धारण केले होते. कारला लागलेल्या या भीषण आगीशी सामना करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावून भुईंज पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष असलेले पोलीस कॉन्स्टेबल रविराज वर्णेकर यांनी अग्निशामक बांबाचा पाण्याचा पाईप स्वतः हातात घेऊन भीषण लागलेली आग विझवण्या साठी पुढे येऊन त्यांनी आग लागलेल्या कारवर पाण्याचा मारा करून ती आग आटोक्यात आणण्या साठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना दिसत होते त्यांनी प्रसंगावधान दाखवत तब्बल अर्ध्या तासामध्ये आग आटोक्यात आणण्या साठी यश मिळवले त्यामुळे कारचे दोन्ही बाजूचे टायर पेटले व चालक केबिन पेटलेले होते रविराज वर्णेकर यांच्या या धाडसी कृत्यामुळे 50% कार जळण्या पासून वाचविण्यास यश आले. त्यामुळे सातारा पुणे या महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवावी लागली रविराज वर्णेकर या धाडसी पोलिस कॉन्स्टेबल ची धाडसी कामगिरी पाहून नागरिकांसह वाहन चालकांनी कौतूक केले आहे. व त्यांच्या या धाडशी कामगिरीला सलाम ठोकला आहे. सातारा पोलीस दलातील अशा पोलीस जवानांची कामगिरी सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अवगत केल्यास अपघातातील जखमी आणि मृत्यूची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल.