मसूर : शिरवडे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांनी दिली.
शिरवडे ता.कराड.येथे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद साताराचे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून१५ वा वित्त आयोग व जनसुविधा या योजनेअंतर्गत नंदीवाले वस्ती कॉंक्रीट रस्ता, आण्णा थोरात यांच्या घरापासुन ते विश्वनाथ थोरात यांच्या घरापर्यंत गटर काम, अंगणवाडी दुरुस्ती व नविन स्मशानभूमी बांधणे या कामांचे भुमीपुजन आज पार पडले. यावेळी ते बोलत होते.
थोरात पुढे म्हणाले आपल्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच करत आलो आहे. यापुढेही पदाच्या माध्यमातून जनतेसाठी अधिकाधिक विकास कामे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी युवा नेते शरद चव्हाण, कराड उत्तर युवक कॉंग्रेस सरचिटणीस शहानुर देसाई, संदीप बोराटे,निवास थोरात,माजी चेअरमन विश्वनाथ आण्णा, दादासो पवार, सुभाष पवार, जयवंत थोरात, संदिप थोरात, आण्णा चेअरमन, संजय जगदाळे, महेश पवार, सदस्य संदिप जगदाळे, अशोक पवार, श्रीमंत पाटील, राजेद्र थोरात, सुहासराव थोरात, संतोष मोहिते, शहाजी पवार, व्यंकटेश पवार, आनंदा थोरात,बाजीराव जगदाळे,थोरात सर,महेश थोरात, ग्रामस्थ तसेच विविध विकासकामांचे भूमीपूजन प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात, शरद चव्हाण, संदीप बोराटे, दादासो पवार,सुभाष पवार,इतर ग्रामस्थ उपस्थित होते.