फलटण प्रतिनिधी. दिनांक २४/१०/२०२३
श्रीदत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असून मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रति टन १०० रुपये प्रमाणे देणार असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या ५ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सांगितले
यावेळी महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री, श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, करण रुपारेल, कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप,सूरज बांदल यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीमंत रामराजे म्हणाले, श्रीदत्त इंडिया साखर कारखाना दरवर्षी शेतकऱ्यांना उसाच्या एफ आर पी ची संपूर्ण रक्कम एकाच हप्त्यामध्ये देत असतो मात्र या वर्षी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून कंपनीचे संचालक प्रीती रूपारेल व जितेंद्र धारू यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अधिकचे १०० रुपये देणार असल्याचे कबूल केले असल्याचे त्यांनी यावेळी संगीलते कार्यक्रमाला चीफ इंजिनिअर अजित कदम, को जन मॅनेजर दीपक मोरे, कॅन मॅनेजर सदानंद पाटील, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपटराव भोसले, गोरख भोसले पै संतोष भोसले, महेश भोसले, संजय जाधव शेतकी अधिकारी बागनवर, चीफ केमिस्ट नितीन नाईकनवरे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, डिस्टलरी मॅनेजर विजय जगताप, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे,ईटीपी मॅनेजर सचिन भोसले, डब्ल्यूटीपी मॅनेजर बुनगे,सुरक्षा अधिकारी अजय कदम,अमर निंबाळकर,संजय भोसले,शरदराव जाधव,संतोष शेंडगे शेतकरी व कामगार उपस्थित होते.
चौकट…..
शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊ तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास सहकार्य करावे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप