बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी बाळासाहेब शिंदे यांची निवड….
पाटण: महाराष्ट्रातील अग्रणी शेतकरी संघटना बळीराजा यांनी आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नविन बदल करण्यास सुरुवात केली असून मजबूत संघटना बांधणीवर जोर धरला आहे. राज्यात शेतकरी यांचे अनेक प्रश्न असून त्यांना वाचा फोडण्यासाठी संघटना बांधणीत अनेक फेरबदल करण्यात आले असून त्याचाच एक भाग बाळासाहेब शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी निवड हा आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र हा सहकारचा उगम समजला जातो. अनेक शेतकरी संघटना यांचा जन्म देखील पश्चिम महाराष्ट्रातून झाला आहे. मूळात निकलंक असे व्यक्तीमत्व असलेले बाळासाहेब शिंदे मूळ शेतकरी कुटुंबातील असून सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यावसायिक म्हणून ते सुपरिचित आहेत. शेतकरी संघटनेत मागील वर्षी पाटण तालुकाध्यक्ष ते सातारा जिल्हा उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहीला.

मिळालेल्या अल्प काळात त्यांनी आपला ठसा उमटविला. त्याची दखल घेत संघटनेने त्यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी निवड केली त्यामुळे आता आपले कार्य सिध्द करण्यास त्यांना एक संधी मिळाली आहे.
पाटण तालुक्यातील ऊरुल गावचे शेतकरी व संघटनेत सक्रीय असलेले नामदेवराव देसाई यांची पाटण तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेत पाटण तालुक्याला न्याय दिल्याबद्दल पाटणच्या शेतकरी यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.





















