सातारा (जिमाका): केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत बैठक. दुपारी 1.15 वाजता पत्रकार परिषद. स्थळ : शासकीय विश्रामगृह सातारा व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथून प्रयाण. दुपारी 3 वाजता डवरी ता. पाटण येथे आगमन. 3.15 वाजता पुरपरिस्थिती झालेल्या ठिकाणांची पाहणी. दुपारी 4 डवरी ता. पाटण येथून प्रयाण. 4.20 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह ता. पाटण येथे आगमन व पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना किटचे वाटप व त्यानंतर कासेगाव ता. वाळवाकडे वाहनाने प्रयाण.






















