महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : दहिवडी
कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सामान्य माणूस आणि शेतकरी हैराण झाला आहे. माण तालुक्यातील एकमेव नगरपालिका असणारे म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. यांचा विचार लक्षात घेऊन म्हसवड मधील जनतेने लोकसहभागातुन आम्ही म्हसवडकर या ग्रुपने कोविड सेंटरची स्थापना केली. मात्र ऑक्सिजनची कमतरता भासत होती.

ही कमतरता भासू नये म्हणून म्हसवड व परिसरातील सामान्य गोर-गरीब नागरीकांना ऑक्सिजनमुळे कठिण प्रसंग येवू नये यासाठी आम्ही म्हसवडकर यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून लोकसहभागातुन सुरु केलेले १५ बेडचे ऑक्सीजनसह कोव्हीड सेंटरला ऑक्सिजनची टंचाई भासु नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.अनिलभाऊ देसाई व कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या जि.प.सदस्या सौ.सुवर्णाताई अरुण देसाई यांनी देसाई उद्योग समुहा तर्फे गुरुवार दिनांक २४/९/२०२० रोजी सकाळी १० वाजता कोव्हीड सेंटर या ठिकाणी ५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर अनिलभाऊ देसाई यांचे हस्ते भेट दिले.या वेळी युवराज सूर्यवंसी, तानाजी काटकर ,डॉ.कोडलकर ,डॉ मोड़ासे,कैलास भोरे,डॉ.शाहा,सचिन मंगरोळे,गणेश माने,बंटी माने, जलिंधर खरात,भागवत जानकर,अविनाश मासाळ, उपस्थित होते
































