महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/
शिरवळ: खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवारी) खंडाळा येथील किसन वीर स्मारक सभागृहात सकाळी आठ वाजता सुरु होणार असून त्यामध्ये २१ टेबल वर सात फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी दशरथ काळे यांनी दिली.
गावाचे कारभारी ठरवणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक गावात चुरशीच्या लढती झाल्या आहेत. आता गावकारभाऱ्यांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजनी नंतरच्या निकालाकडे लागली आहे.
खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती . त्यामध्ये पळशी , कराडवाडी , वाण्याचीवाडी , लिंबाचीवाडी , हरळी , कान्हवडी , घाडगेवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर विविध ग्रामपंचायतीत १३१ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत . ५० ग्रामपंचायतीच्या ३२० जागासाठी ६९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.उद्या मतमोजणीच्या
पहिल्या फेरीत पाडेगाव, वाठार बुद्रुक, बोरी ,सुखेड ,मरीआईचीवाडी ,लोणी व पिंपरी बुद्रुक .
दुसऱ्या फेरीत बावकलवाडी ,पाडळी, निंबोडी ,बाळूपाटलाचीवाडी , खेड बुद्रुक ,अंदोरी, पिसाळवाडी व धनगरवाडी.
तिसऱ्या फेरीत कोपर्डे, नायगाव, तोंडल ,शेखमिरेवाडी ,गुठाळे ,सांगवी , शेडगेवाडी ,मिरजे ,झगलवाडी व अंबारवाडी.
चौथ्या फेरीत वडगाव ,भोळी ,राजेवाडी , वाघोशी, कवठे ,अतीत व शिंदेवाडी.
पाचव्या फेरीत म्हावशी, कर्नवडी, लोहोम ,धावडवाडी ,भादे ,विंग व केसुर्डी.आ
सहाव्या फेरीत अजनुज, जवळे, भादवडे ,मोर्वे ,घाटदरे ,शिवाजीनगर, पारगाव व कन्हेरी.
सातव्या फेरी दरम्यान बावडा व अहिरे आदी ग्रामपंचायतीमध्ये ज्या प्रभागा मध्ये निवडणुक झाली अशा सर्व प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे.