फलटण : फलटण शहरामध्ये 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा सुमारे 11 हजार रुपयांचा किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. फलटणमध्ये पाचबत्ती चौक, येथे 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. दस्तगीर मोहम्मद शेख त्याची पत्नी आयुष्य दस्तगीर शेखयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनियबातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, फलटण शहरामध्ये पाचबती चौक या ठिकाणी गांजा विक्री होत आहे. त्या नुसार फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी आदेश देवून पोलीस पथक यांनी धाड टाकली असता दस्तगीर महम्मद शेख त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख असे गांजा विक्री करत आहेत असे दिसून आले. यांचे ताब्यातील २ किलो ५९२ ग्रॅम वजनाचा१० हजार ८०० रुपयांचा गांजा हा मिळुन आला. नायब तहसिलदार श्रीमती संजोधोनी सांवत सरकारी पंच, वजनमाप करणारे, फोटोग्राफर यांचे समक्ष कारवाई करण्यात आली.
सदर बाबत सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रघुनाथ गायकवाड यांनी दस्तगीर महम्मद शेख व त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख त्यांचे विरुध्द गुंगोकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम सरकारतर्फे फिर्याद दिली असून फलटण शहर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी कॅम्प निलेश देशमुख, अति कार्य फलटण विभाग फलटण, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, पोलीस नाईक शरद तांबे महिला पोलीस शिपाई अनिता गाडेकर, महिला पोलीस शिपाई रुपाली कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल बगले, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे , पोलीस हवालदार चंद्रकांत धापते, चालक पोलीस नाईक कर्पे, पोलीस हवालदार माने, चालक पोलीस नाईक मदने यांनी केली आहे.