उपजिल्हा रूग्णालयातील 5 मागण्या मार्गी
तिन मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक, मनोज माळी यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडले.
मनोज माळी यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडताना डॉ. सुभाष चव्हाण, बी.आर.पाटील, डॉ.प्रकाश शिंदे, डॉ.अशोक गुजर व अन्य.
शहरातील सर्व रेडिओलॉजिस्टचे सहकार्याचे अश्वासन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत प्रहारच्या वतीने मनोज माळी यांनी सुरू केले उपोषण बुधवारी सातव्या दिवशी सोडण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकिस्तक, रूग्ण कल्याण समिती, शहरातील रेडिओलॉजिस्ट, पोलिस प्रशासन व प्रहारचे पदाधिकारी यांच्या बैठकीत आठ पैकी 5 मागण्या मार्गी लावण्यात आल्या. तर तिन मागण्या राज्य पातळीवरील असल्याने नामदार बच्चू कडु यांच्या माध्यमातुन आरोग्य मंत्र्यांसोबत मंत्रालयात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत मांडण्याचे ठरले. जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन मनोज माळी यांचे उपोषण सोडण्यात आले. कराड, पाटण व कडेगाव तालुक्यातील गोगरीब रूग्णांच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या कराडच्या सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त तज्ञ, डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, कर्मचारी व अन्य गैरसोयीबाबत प्रहारचे मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी 5 मे पासुन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दारात अमरण उपोषण सुरू केले होते.
गोगरीब रूग्णांच्या जिव्हाळयाचा विषय असल्याने कराड शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजीक क्षेत्रातुन या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार व विविध सामाजीक संघटनांनी मंगळवारी कोल्हापुर नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन चिघळत असल्याने प्रशासनाने आखेर बुधवारी सायंकाळी उपजिल्हा रूग्णालयात बैठक आयोजत केली होती.या बैठकीत जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. सुभाष चव्हाण यांनी उपजिल्हा रूग्णालयाला कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञाची नेमणुक करीत असल्याचे जाहीर केले. तसेच वर्ग चार चे दोन कर्मचारी तत्काळ देण्याचे मान्य केले. तसेच रूग्णालयातील स्वच्छतेचे टेंडर राज्य पातळीवरून काढण्यात येते. त्यामुळे टेंडर संपल्यानंतर रूग्णालयातील स्वच्छतेच्या तिन तेरा वाजत आहेत. यापुढे स्थानिक पातळीवरच स्वच्छतेचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवर नेमलेल्या ठेकेदाराची केवळ मान्यता राज्य माळीवरून घेण्यात येणार आहे. तर उपजिल्हा रूग्णालयात सध्या दोन डायलिस मशिन आहेत. आणखी एक मशिन लवकरच उपलब्द होणार आहे. यासाठी लागणारा स्टाफची फाईल मुख्य कार्याकारी अधिकारी यांच्या टेबलवर आहे. मंगळवारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल असे डॉ.सुभाष चव्हाण यांनी सागीतले. या बैठकीला जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. सुभाष चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कोरबु, डिवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बि.आर. पाटील, डॉ.अशोक गुजर, डॉ.अनिल लाहोटी, मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे व कार्यकर्ते उपस्थीत होते.शहरातील सर्व रेडिओलॉजिस्ट सहकार्य करणारउपजिल्हा रूग्णालयात सोनाग्राफी मशिन आहे. मात्र रेडिओलॉजिस्ट नसल्याने रूग्णालयात येणाऱया सर्वच रूग्णांना सोनोग्राफिची सेवा देता येत नाही. याबाबत बैठकीला उपस्थीत असलेल्या शहरातील रेडिओलॉजिस्टना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. शहरातील रेडिओलॉजिस्टनी सामाजीक बांधीलकी म्हणुन दररोज एकाने किमान दोन तास सेवा देण्याची विनंती करण्यात आली. यावर रेडिओलॉजिस्ट यांनी उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफिसाठी येणारे रूग्ण आमच्याकडे विभागुन पाठवण्याची सुचना मांडली आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करूण गुरूवारी प्रशासनाला रेडिओलॉजिस्टचे नियोजन कळवणार असल्याचे सांगण्यात आले. 200 बेड, ट्रामा केअर व सिटीस्कॅनसाठी मंत्रालयात बैठक*उपजिल्हा रूग्णालयाला 200 बेडची मान्यता, ट्रामा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशिन या मागण्या राज्य पातळीवरील आहेत. याबाबत नामदार बच्चू कडु यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना. बच्चू कडु यांनी या मागण्याबाबत आरोग्य मंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक आयोजीत करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे या मागण्या मंत्रालयातील बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगीतले.