दहिवडी : ता.०२
दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांना रयत शिक्षण संस्थेचा यंदाचा “प्रबोधनकार ठाकरे आदर्श प्राचार्य” पुरस्कार जाहिर झाला आहे.
डॉ. साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये गेल्या २० वर्षेपासून प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळत आपल्या कार्याचा प्रभावी ठसा उमटवला आहे. वृक्ष संवर्धन, कमवा आणि शिका योजना, महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, महाविद्यालयांच्या पायाभूत सेवा, कौशल्य विकसन कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठीय समित्यांचे कार्य, संशोधक, संशोधन मार्गदर्शक याबाबतीत डॉ. साळुंखे यांनी भरीव योगदान दिले आहे.
*तसेच, डॉ. साळुंखे यांची नॅकच्या बेंगलोरस्थित कार्यालयाने “नॅक पिअर टीम”चे सदस्य म्हणून नुकतीच निवड केली आहे.*
रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी येत्या दि. ४ ऑक्टोबर रोजी सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार डॉ. साळुंखे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांना सदर पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख,संघटक डॉ. अनिल पाटील, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव बी . एन. पवार, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, जरनल बॉडी सदस्य डॉ. प्रदिपकुमार शिंदे, सौ. निलिमा पोळ, हर्षदा देशमुख-जाधव, हनुमंत भोसले, सुभाष सस्ते, उपप्राचार्य डॉ. ए. एन. दडस, उपप्राचार्य डॉ. संजय खेत्रे, उपप्राचार्या नंदिनी साळुंखे, प्रा. डॉ. किशोर पवार, कार्यालय अधिक्षक केशव औटे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी अभिनंदन केले.