पाटण : पाटण येथील कोयना शिक्षण संस्थेचे बाळासाहेब देसाई कॉलेजला तंजावरचे महाराज आबाजी राजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली.
छ.शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांचे वंशज आहेत. शिवछत्रपतीचा इतिहास हा प्रेरणादायी इतिहास आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना स्थापण्याची प्रेरणा शहाजीराजे व जिजामाता यांच्याकडून शिव छत्रपतीना मिळाली होती. तंजावर मध्ये सुद्धा मराठा राज्य वाढविण्याचा प्रयत्न त्याकाळात झाला होता. हिंदू स्वराज्याची प्रेरणा दोघांच्याही मनी होती. मराठा साम्राज्याचा विस्तार तंजावर प्रांतात कसा झाला याची त्यांनी माहिती दिली. तंजावर मधील भोसलेंच्या कारकिर्दीत इतिहासात महत्वाचे स्थान आहे. तंजावरच्या इतिहासात मराठा राजांचे मोठे योगदान आहे. पण त्याची फारशी चर्चा होत नाही. मराठ्यांचा हा इतिहास जगापुढे आला पाहिजे. “कॉन्ट्रीब्युशन ऑफ तंजावर मराठा किंग” हे पुस्तक अलीकडे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात व्यंकोजीराजे व त्यांच्या नंतरच्या राजांची माहिती तसेच अलीकडच्या काळातील साहित्य, नाट्य, आयुर्वेद, पाकशास्त्र अशा विविध क्षेत्राची माहिती दिली गेली आहे.

त्याचबरोबर पुन्हा एकदा तंजावर व महाराष्ट्रातील मराठी बांधवाचा स्नेह जुळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आबाजीराजे यांनी महाविद्यालयातील सुसज्ज क्रीडा संकुल, संगणक लॅब, नवीन ऑडीटोरीयम हॉल ला भेट देवून समाधान व्यक्त केले. कोयना शिक्षण संस्थेचे ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या नवीन सुरु झालेल्या कॉलेजसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे संचालक यज्ञसेन पाटणकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस.डी.पवार, अधीक्षक विजय काटे यांची उपस्थिती होती.






















