कराड : कराड बस स्थानक येथे नागरिकांमध्ये फिरतायत मोकाट पिसाळलेले कुत्रे व एसटी महामंडळाच्या आवारात एसटी आत येताना जीवघेणे असणारे खड्डे व कराड बस स्थानकाच्या आजू -बाजूस घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी या सर्व गोष्टीवर कराड एसटी बस स्थानक आगार यांना कधी जाग येणार याची नागरीक वाट बघावी लागणार.
कराड एसटी महामंडळ आगार यांना नागरिकांच्या जीवाचे कोणतीही परवा नाही. एसटी महामंडळामध्ये मोकाट पिसाळलेले कुत्रे बऱ्याच प्रमाणात वावर नागरिकांवर वारंवार कुत्र्याचे धावून जाणे व एसटी महामंडळाच्या आवारात एसटी आत येताना- जीवघेणे असणारे खड्डे या खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडू शकतो. तरी कराड बस स्थानक आगार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये. या सर्व गोष्टीवर कराड एसटी महामंडळ आगार यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे