फलटण : रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक क्रमांक 47, किलोमीटर 122/8-9, वाठार पळशी येथील दोन दिवस बंद राहणार आहे.
गुरुवार दि. 23 सप्टेंबर सकाळी 7 वाजल्यापासून शुक्रवार दि.24 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये खालील पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याची विनंती वरिष्ठ सेक्शन इंजिनियर, वाठार, मध्य रेल्वे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. पर्यायी मार्ग वाठार- पिंपोडे -दहिगाव -देऊर, वाठार- दहिगाव – देऊर , वाठार- तळीये- -बिचुकले- गुजरवाडी- पळसी या मार्गांचा वापर करावा.






















