फलटणच्या पश्चिम भागातील कोरोना रुग्णांना दिलासा
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी/फलटण (गणेश पवार) : साखरवाडी ता फलटण या ठिकाणी श्री दत्त इंडिया या साखर कारखान्याच्या श्रीदत्त फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी ६५ बेडचे सुसज्ज आयसोलेशन सेंटर उभारले असून याचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कोरोना या महामारी चा प्रादुर्भाव राज्यासह पूर्ण ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात फोफावला असून शासकीय व खाजगी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत या गोष्टीची सामाजिक बांधिलकी जपत साखरवाडीच्या श्रीदत्त इंडिया या साखर कारखान्याच्या श्री दत्त फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साखरवाडी व फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील इतर गावांना या आयसोलेशन सेंटरचा लाभ मिळणार असून याठिकाणी रुग्णांना दोन वेळेचे जेवण, चहा ,नाष्टा व सर्व औषध उपचार मोफत मिळणार असून उद्यापासून हे आयसोलेशन सेंटर रुग्णांच्या सेवेत सुरु होत असल्याची माहिती श्रीदत्त फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली
यावेळी श्रीदत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, चेतन धारू श्रीदत्त इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप सिव्हिल विभागाचे इन्चार्ज राजेंद्र भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे पोपट भोसले,गोरख भोसले , संजय जाधव व इतर पदाधिकारी,ऋतुराज पाटील तसेच पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर , ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, अभयसिंह निंबाळकर, संजय भोसले,सचिन भोसले, युनिटी बिल्डटेक चे नाईक निंबाळकर व इतर उपस्थित होते.





























