पिंपोडे बु।।-प्रतिनिधी
येनाऱ्या सण,उत्सव व निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाठार पोलिसांनी कंबर कसली आहे़.अंबवडे संमत वाघोली ता.कोरेगाव येथील सराईत गुंड सागर सर्जेराव सकुंडे (वय २१ ) याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सण,उत्सव आणि निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.वाठार पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सकुंडे याच्यावर वाठार पोलीस ठाण्यात दरोडा,गर्दी जमवून मारामारी केल्याचे,अदखलपात्र गंभीर गुन्हे दाखल आहेत़.त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्यात काहीही सुधारणा होत न्हवती त्याच्या वागणुकीमुळे परिसरात व गावात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलीस आधीक्षक अजयकुमार बन्सल आणि कोरेगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन उपविभागीय दंडाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे पाठविला होता.पाटील यांनी त्याला मान्यता देऊन सागर सकुंडे या गुन्हेगारास दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आहे़.याच बरोबर मागील काही दिवसात वाठार पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चार गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाही करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.यापुढेही वाठार पोलीस ठाणे हद्दीतील समाजात दहशत माजवनाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडावर अशाच प्रकारे कारवाही करण्यात येणार आहे असे वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संजय बोंबले यांनी सांगितले आहे.