महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी : कोविड चे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करत आहेत.दोन टप्प्यात करण्यात येणाऱ्या या तपासणीचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर असा असून त्यानंतर दुसरा टप्पा 10 ऑक्टोबर 24 ऑक्टोंबर असा आहे.
या निमित्ताने हेळगाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा वर्कर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्रत्येक परिवाराची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट देऊन प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे संशयित तपासणी व उपचार,अति जोखमीची व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व covid-19 प्रतिबंधासाठी आरोग्यशिक्षण सारी व आय एल आय रुग्णांचे सर्वेक्षण तपासणी आणि उपचार तसेच प्रत्येक नागरिकाचे covid-19 बाबतच्या आरोग्य शिक्षण अशी शासनाची उद्दिस्ते या सर्वेक्षणामध्ये आहेत. त्यानुसार प्रत्येक गावोगावी हे सर्वेक्षण सुरू असून हेळगाव मध्ये ही अशाच प्रकारचा पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. प्रशासनास याकामी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे